ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरले आहेत. त्यांनी ठाकरे सरकारवर मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा.1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले. ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार.
रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा
1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले
ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार pic.twitter.com/qc3SLnJF1P
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2023
उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.’ 7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाडय़ापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. रिचार्ड्सन क्रूडास कंपनीकडून भाडय़ाने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही, असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले.