400 मीटरच्या खोलीवर अस्तित्वात ,लाव्हारस नव्हे माती बाहेर पडतेय
वैज्ञानिकांनी नॉर्वेच्या किनाऱ्यापासून नदूर बॅरेंट्स सागराच्या तळाशी एक ज्वालामुखी शोधला आहे. हा 400 मीटरच्या खोलवर असलेला मातीचा ज्वालामुखी आहे. वैज्ञानिकांनुसार हा बॅरेंट्स समुद्रात आढळलेला दुसरा मातीचा ज्वालामुखी आहे. यापूर्वी 1995 मध्ये हकोन मोस्बी मड वोल्केनो शोधण्यात आला होता.
वैज्ञानिकांनी नव्या ज्वालामुखीला ‘बोरेलिस मड वोल्केनो’ नाव दिले आहे. हा समुद्रात 300 मीटर (984 फूट) रुंद आणि 25 मीटर खोल ख•dयात अस्तित्वात आहे. या ज्वालामुखीचा व्यास 7 मीटर (23 फूट) आणि 2.5 मीटर उंचीचा आहे. यातून मिथेन वायू बाहेर पडत आहे. मिथेन वायूच पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचे कारण ठरला आहे.
मड वोल्केनोला (मातीचा ज्वालामुखी) मड डोम देखील म्हटले जाते. याच्या आतून लाव्हारस नव्हे तर माती किंवा स्लरी बाहेर पडते. तसेच पाणी आणि वायू देखील बाहेर पडत असतो. प्रत्यक्षात हे ज्वालामुखी नसतात, परंतु त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना ज्वालामुखी म्हटले जाते. यातून बाहेर पडणारी माती भूभर्गातील तप्त पाण्यासोबत वरच्या दिशेने येते, ज्याला स्लरी म्हटले जाते. सर्वसाधारणपणे मातीच्या ज्वालामुखींमधून 86 टक्के मिथेन वायू बाहेर पडतो. काही प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड आणि नायट्रोजनही उत्सर्जित होत असतो.
द आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वेच्या संशोधकांनी या ज्वालामुखीला रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल म्हणजेच आरओव्ही ओरोरामध्ये लावण्यात आलेल्या रिसर्च व्हॅसल क्रोनप्रिन्स हाकोनाच्या मदतीने शोधले आहे. हा ज्वालामुखी बेयर बेटापासून 70 सागरी मैल अंतरावर आहे. पाण्याखालील ज्वालामुखी आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या मातीमुळे आमचा ग्रह किती जिवंत आहे समजते असे उद्गार एकेएमएचे प्रमुख प्राध्यपाक गिउलियाना पनियरी यांनी काढले आहेत. एकेएमए प्रकल्पाद्वारे समुद्रतळातील मिथेन वायूवर संशोधन केले जात आहे.