आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांचे आवाहन. मेणकुरे व साळ येथील शेतकऱयांना बियाणे व खत वितरीत.
डिचोली/प्रतिनिधी
पूर्वीची शेती व आजच्या काळातील शेती यात मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळात शेतकामासाठी समाधानकारक कुशल कामगार मिळत होते. मात्र आजच्या काळात शेतकामातील कुशल कामगार मिळणे मुश्कील झाल्याने त्याचा परिणाम अनेक ठिकाणी शेतांवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी आज शेतकऱयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतांमध्ये कमी मनुष्यबळात आणि कमी वेळात चांगले पिक घेण्यासाठी तत्पर रहावे, असे आवाहन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी मेणकुरे येथे केले.
साळ व मेणकुरे गावातील शेतकऱयांना शेतांसाठी खत व बियाणे वितरणाचा कार्यक्रम मेणकुरे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, शिक्षा व्हिजनचे सचिव दिलीप धारगळकर व इतरांची उपस्थिती होती.
डिचोली मतदारसंघ हा शेतीप्रधान भाग असून या भागातील बऱयाच शेतकऱयांनी आज शेती करताना नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले आहे. शेती लागवडीसमोर आज विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे आहेत. या संकटावर मात करून कमी वेळेत आपले काम फत्ते करण्यासाठी शेतकऱयांनी प्रयत्न करावे. डिचोली शिक्षा व्हिजनने गेल्या वषीही शेतकऱयांना बियाणे व खत वितरीत केले होते. यापुढेही शेतकऱयांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार, असेही यावेळी आमदार डॉ. चंद्रकात शेटय़? यांनी म्हटले.
या कार्यक्रमात साळ व मेणकुरे धुमासे गावातील शेतकऱयांना मोफत खत व बियाणे वितरीत करण्यात आले. शेतकऱयांनीही यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.