दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी
अमेझॉन प्राइम व्हिडिओची सीरिज ‘जुबली’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. या सीरिजमधील वामिका गब्बीच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. वामिकाने यात नीलोफर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. वामिकाला आता आणखी एक दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेत्री वामिका लवकरच फिल्म सीरिज ‘मॉडर्न लव्ह चेन्नई’च्या एका कहाणीत दिसून येणार आहे. अमेरिकन फिल्म अँथोलॉजी ‘मॉडर्न लव्ह’चे हे देशी रुपांतरणर आहे. या सीरिजच्या चित्रपटांचे दिग्दर्शन दक्षिणेतील दिग्गजांकडे सोपविण्यात आले आहे. यातील एक चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक त्यागराजन कुमार राजा यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात येत आहे. यापूर्वी वामिकाने बहुचर्चित सीरिज ‘मॉडर्न लव्ह मुंबई’मध्येही काम केले आहे.
कारकीर्दीच्या प्रारंभी अशा रोमांचक दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला सुदैवी मानते. हिंदी व्हर्जनमध्ये विशाल भारद्वाज आणि तमिळ व्हर्जनमध्ये त्यागराजन कुमार राजा यांच्यासोबत काम करता येणार आहे. ‘मॉडर्न लव्ह’ या फ्रँचाइजीने एना हॅथवे, देव पटेल, ज्यूलिया गार्नर यासारख्या दमदार कलाकारांसोबत जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. मुंबईनंतर आता चेन्नई व्हर्जनसाठी अशाप्रकारच्या फ्रँचाइजीचा हिस्सा होणे माझ्यासाठी रोमांचक असल्याचे वामिकाने म्हटले आहे.