टोयोटा किर्लोस्कर, स्कोडासह अन्य कंपन्यांची मजबूत कामगिरी-परिस्थितीत सुधारल्याचे संकेत
नवी दिल्ली
मागील दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वाधिक प्रभावीत झालेले क्षेत्र म्हणून वाहन क्षेत्राकडे पाहिले जात होते. परंतु चालू वर्षात कोरोना प्रतिबंध हटले जाऊन स्थिती सामान्य झाल्याने मागील दोन महिन्यांपासून तरी वाहन क्षेत्र सकारात्मक कामगिरी करत असल्याचा दावा वाहन क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. आपण मे महिन्यातील विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीचा आढावा घेणार आहोत.
टोयोटा किर्लोस्करची विक्री 14 पट
वाहन निर्मितीशी संबंधीत असलेली कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)च्या वाहनांची एकूण विक्री मे महिन्यात 14 पट होत विप्रीचा आकडा 10,216 वर पोहोचला आहे. मागील वर्षी मे महिन्यात फक्त 707 वाहनांचा पुरवठा कंपनीने केला होता.
मे मध्ये स्कोडाची विक्री वधारली
स्कोडा ऑटो इंडियाची विक्री मे 2022 मध्ये सहा पटीने वाढून 4,604 युनिट झाली आहे. कंपनीने बुधवारी या संदर्भात माहिती देताना म्हटले आहे, एक वर्षाच्या अगोदर मे महिन्यात कोरोना संकटादरम्यान 716 वाहनांची विक्री झाली होते. मागील महिन्यातील कामगिरीत स्लाविया व कुशाक मॉडेलची विक्री विक्रमी स्तरावर झाली आहे.
बजाजची वाहन विक्री 2,75,868 वर
देशातील वाहन निर्मिती करणारी कंपनी बजाज ऑटोची मे महिन्यात एकूण वाहन विक्री काहीशा प्रमाणात वाढत जात 2,75,868 युनिट्वर राहिली आहे. हाच आकडा मागील वर्षात समान कालावधीत 2,71,862 इतका होता. मे महिन्यात देशांतर्गत विक्री 85 टक्क्यांनी वधारत 1,12,308 इतकी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुचाकी विक्रीचा टक्का 59 वर राहत मजबूत राहिला आहे.
एमजी मोटारची किरकोळ विक्री दुप्पट
एमजी मोटार इंडियाची मे 2022 मध्ये किरकोळ वाहन विक्री दुप्पट होत 4,008 इतकी झाली आहे. मागील एक वर्षाच्या समान कालावधीत विक्री 1,016 इतकी होती. तर एप्रिल 2022 मध्ये एमजीने 2,008 वाहनांची विक्री केली होती.
एमजी मोटार इंडियाने म्हटले आहे, की मे महिन्यात त्यांची किरकोळ विक्री सकारात्मक राहिली असून मोठय़ा प्रमाणात सेमीकंडक्टर चिप उपलब्ध झाल्याने विक्रीत सुधारणा राहिल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मारुतीची विक्री तेजीत
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री मे 2022 मध्ये 1,61,413 वर राहिली आहे. मे 2021 मध्ये हा आकडा 46,555 इतका राहिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
अशोक लेलँडची व्यावसायिक वाहन विक्री वधारली
हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडची एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री मे 2022 मध्ये चारपटीने वधारुन 13,273 वर राहिली आहे. मागील वर्षी कंपनीने कोरोनाच्या संकटामुळे 3,199 इतकी वाहन विक्री केली होती.
टाटा मोर्ट्सची वाहन विक्री तीन पटीने वाढली
वाहन निर्मितीमधील कंपनी टाटा मोर्ट्सची एकूण विक्री मे महिन्यात जवळपास तीन पटीने वधारुन 76,210 राहिली आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालवधीत विक्री ही 26,661 झाली आहे. देशातील विक्रीही तेजीत राहिली असून ती 74,755 झाली आहे.