महिलांमध्ये स्लीपिंग डिसऑर्डर अधिक
एका नव्या अध्ययनानुसार वाढत्या तापमानासोबत आमच्या झोपेचा कालावधी कमी होत चालला आहे. रात्री उष्णता वाढत असल्याने हे घडत आहे. एक व्यक्ती सरासरी दरवर्षी स्वतःच्या झोपेचे 44 तास गमावत आहे. डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठाच्या संशोधनात ही बाब दिसून आली आहे.
हे संशोधन 68 देशांच्या 47,000 लोकांवर करण्यात आले. वैज्ञानिकांनी रिस्ट बँड्सच्या मदतीने या लोकांच्या 70 लाख रात्रींच्या झोपेला ट्रक केले. पृथ्वीच्या तापमानात वाढ होत चालल्याने आम्ही आमच्या झोपेचे आणखीन काही मौल्यवान क्षण गमावत आहोत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
हा निद्रानाश पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एक चतुर्थांश अधिक होत आहे. तसेच 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये दुप्पट तर कमी उत्पन्नगटाच्या देशांच्या लोकांमध्ये हे प्रमाण तीनपट आहे. यापूर्वी झालेल्या अध्ययनात वैज्ञानिकांनी मानसिक आरोग्य, हृदयविकार, आत्महत्या आणि दुर्घटनांवर हवामान बदलाच्या प्रभावाचा अभ्यास केला होता.
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या त्वचेखाली फॅट अधिक असते, यामुळे त्यांची कूलिंग प्रोसेस मंद होते. यामुळे महिलांमध्ये निद्रानाश अधिक दिसून येत असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे.