पुणे / प्रतिनिधी :
दुचाकी चोरणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून 6 लाख 17 हजार रुपयांच्या तब्बल 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने सोलापूर परिसरात दुचाकींची विक्री केली होती. पथकाने त्याच्याकडून सर्व चोरलेली वाहने जप्त केली आहेत.
सुरेश संभाजी वाघमारे ( वय 28, रा. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाचे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. हडपसर परिसरातील वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे यांना दुचाकीचोराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुरेश वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हडपसर, लोणीकाळभोर, लोणीकंद परिसरातून तब्बल 21 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव यांनी केली.
अधिक वाचा : महाराष्ट्रात हुडहुडी कायम