वृत्तसंस्था/ दुबई
2022 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीने सोमवारी पुरुषांचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर केला असून त्यामध्ये भारताच्या विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांचा समावेश करण्यात आला आहे.
2022 सालाच्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया विविध देशांच्या क्रिकेटपटूंचा आढावा घेत आयसीसीने सर्वोत्तम टी-20 संघाची निवड केली असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. या सर्वोत्तम संघामध्ये भारताचे तीन, इंग्लंडचे दोन, पाकचे दोन, न्यूझीलंड, लंका, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचा प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे. मात्र आयसीसीच्या या सर्वोत्तम संघात ऑस्ट्रेलियाच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला नाही.
आयसीसी टी-20 पुरुष संघ – जोस बटलर, सॅम करण, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांडय़ा, मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हसरंगा, जोश लिटल.