बेळगाव : विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित 24 व्या व्हीटीयू आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेच्या खेळाच्या पहिल्या दिवशी उंच उडीत विवेकानंद कॉलेजच्या यशिथान एन., भालाफेकमध्ये सह्याद्री कॉलेज मंगळूरच्या मेघाश्री तर 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांमध्ये सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज रामनगरचा रंगनाथ सी., मुलींच्या विभागात विवेकानंद कॉलेजच्या विद्या सी. यांनी सुवर्णपदक पटकावित खेळाचा पहिला दिवस गाजविला. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी ऑलम्पिक खेळाडू व राष्ट्रीय विक्रमवीर सहाना कुमारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू व कॉमनवेल गेम्समध्ये सहभाग घेतले बी. जी. नागराज, व्हीटीयूचे कुलगुऊ विद्याशंकर एस. पी. डॉ. पुट्टस्वामीगौडा, प्रो. टी. एन. श्रनिवास, प्रो. बी. ई. रंगास्वामी, एम. ए. सपना उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. सहभागी 217 कॉलेजच्या खेळाडूंनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर स्वागतगीत गायिले. यानंतर व्हीटीयू कालेजचे खेळाडू विश्वास के. एन. तबारक मोमीन, प्रशांत, स्नेहा आजगांवकर यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. खेळाडू अमृता पाटील हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पंथसंचलन स्पर्धेत एनएमएमआयटी कॉलेज नित्ते प्रथम, सीएमआरआयसी कॉलेज बंगळूर द्वितीय, सह्याद्री कॉलेज मंगळूरने तृतीय क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धा व्हीटीयू कालेजचे क्रीडा प्राध्यापक डॉ. पी. पुट्टस्वामीगौडा, साहाय्यक क्रीडा प्राध्यापक मधुकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर स्पर्धा चार दिवस चालणार असून बुधवार दि. 24 रोजी दुपारी 3 वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एम. मुन्सी, प्रो. सरस्वती, रवी गोल्ला तर टी. एन. श्रनिवासा यांनी आभार मानले.
Previous Articleजिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
Next Article आयएनएस विक्रांत सी-बर्डवरील जेटीवर दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.