आपल्याकडे स्वतःची कार असावी आणि भन्नाट वेगाने ती चालवावी, असे स्वप्न अनेक युवकांचे असते. एकेकाळी महिला फारशा ड्रायक्हिंग करीत नसत. पण आता त्यांनाही ड्रायव्हिंगमध्ये पुरुषांइतकीच रुची निर्माण झाल्याचे दिसते. केवळ आवड म्हणून किंवा स्वतःच्या सोयीसाठी कार किंवा बाईक अलीकडच्या महिला चालवित नाहीत. तर ड्रायव्हिंग हे कित्येक जणींचे करिअर बनले आहे.
केरळमधील कोची येथील एक कायद्याची विद्यार्थिनी असलेली एन. मेरी अंसालेन या तरुणीचा छंद वेगळाच आहे. ती स्वतः बस चालवते. कॉलेजला सुटी असताना ती आपली बस बाहेर काढते आणि दर रविवारी कक्कानाड ते पेरुंबदप्पू या मार्गावर ती बस चालवते. या मार्गावर रहदारी आणि प्रवासी मोठय़ा प्रमाणात असतात. तिचे वैशिष्टय़ असे, की ती प्रवाशांना विनामूल्य सेवा देते. तिला सर्वतऱहेची अवजड वाहने चालविण्यास आवडतात. त्यात लॉरी, ट्रक, बस, ट्रक्टर आदी वाहनांचा समावेश आहे. केवळ 15 व्या वषी चारचाकीचे ड्रायव्हिंग शिकली असून 18 व्या वषी तिला अवजड वाहने चालविण्याचा परवाना मिळाला. तिच्या या सेवेमुळे अनेक गरीबांना त्या विशिष्ट मार्गावर विनामूल्य प्रवास करता येतो.