अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची भूमिका : सुभाष वेलिंगकर यांना दिला पाठिंबा
प्रतिनिधी /पणजी
गोवा ही परशुरामाची भूमी आहे. त्यामुळे फ्रान्सिस झेवियर हा ’गोंयचो सायब’ होऊ शकत नाही, असे प्रतिपादन करून प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी कोणतीही चूक केलेली नाही. गोवा ही परशुरामाचीच भूमी आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे झेवियरचे उदात्तीकरण थांबायलाच हवे, अशी भूमिका घेऊन समस्त हिंदुत्वनि÷ संघटनांनी प्रा. वेलिंगकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने उद्या मंगळवार दि. 3 मे रोजी ’गोवा फाइल्स’ खुल्या करण्यात येणार असल्याचे घोषित प्रा. वेलिंगकर त्यांनी जाहीर केले आहे. त्यावेळी त्यांनी झेवियर हा ’गोंयचो सायब’ होऊ शकत नाही, असे विधान केले होते. मात्र त्यातून अनेकांना पोटशूळ उठला व त्यांचा विरोध चालू झाला आहे.
’हातकातरो खांब’ हे गोमंतकातील हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचे प्रतीक
प्रा. वेलिंगकर यांच्यावर विविध पक्ष आणि ख्रिस्ती नेत्यांनी विखारी टीका करणे चालू केले आहे. खरे तर प्रा. वेलिंगकर यांनी केवळ जे इतिहासात घडले, त्याबद्दलच सांगितले आहे. जुने गोवेत चर्चजवळ आजही अस्तित्वात असलेला ’हात कातरो खांब’ हे गोमंतकातील हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचे प्रतीक आहे, हे सर्वश्रूत आहे. अशावेळी आमचा धर्म, संस्कृती आणि समाजबांधवांना हालहाल करून मारणाऱया झेवियरला ’गोंयचो सायब’ म्हटणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय बजरंग दल, हिंदू नववर्ष स्वागत समिती, शिवप्रति÷ान हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र संघटना-डिचोली; स्वराज्य संघटना-म्हापसा; सुराज्य संग्राम-गोवा; छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळ-माशेल; गोमंतक मंदिर महासंघ, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, राष्ट्रीय पत्रकार मंच, हिंदु जनजागृती समिती, श्रीकृष्ण सेल्फ हेल्प ग्रुप खोर्ली-म्हापसा; श्रीब्राह्मण सेल्फ हेल्प ग्रुप खोर्ली-म्हापसा; श्री दत्तगुरु सेल्फ हेल्प ग्रुप भंडारवाडाöअस्नोडा; सिद्धीविनायक सेल्फ हेल्प ग्रुप-म्हापसा; एकता सेल्फ हेल्प ग्रुपöअस्नोडा; साईदत्त सेल्फ हेल्प ग्रुप-अस्नोडा, आदी संघटनांचा वेलिंगकरांना पाठिंबा देणाऱयात समावेश आहे.
ख्रिस्ती बांधवांचा अभिमानच
पोर्तुगिजांच्या अत्याचारांची अनेक प्रतिके वेळोवेळी नष्ट करण्यात आली. ’हात कातरो खांब’ही नष्ट करण्याचे प्रयत्न यापूर्वीच्या सरकारांनी केले होते. परंतु समस्त हिंदुत्वनि÷ संघटनांनी ते उधळून लावले होते. आम्ही कोणाच्या श्रद्धास्थानांवर टीका करत नाही. गोवा मुक्तीसंग्रामात असंख्य ख्रिस्ती बांधवही होते. त्यांचा आम्हाला अभिमानच आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे.
टी. बी. कुन्हानीही लिहून ठेवलाय इतिहास
ज्यांना ’फादर ऑफ गोवन नॅशनलिझम’ म्हटले जाते, त्या टी.बी. कुन्हा यांनीही आपल्या पुस्तकात गोव्यात झालेल्या इन्क्विझिशनरुपी अत्याचारांबद्दल लिहून ठेवले आहे. निदान त्यावरून तरी गोव्यातील ख्रिस्ती समाजाने अशा अत्याचारी झेवियरचे उदात्तीकरण करण्यात पुढाकार घेऊ नये, असे आवाहन या संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
’गोवा फाइल्स’ कार्यक्रमाला हिंदूंनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या संघटनांच्या वतीने आम्ही करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे.