प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील वाजंत्री गल्ली येथील करेव्वा देवीची यात्रा आयोजित केल्याचे करेव्वा पंचकमिटीच्या पदाधिकाऱयांनी जाहीर केले आहे. मंगळवार दि. 14 व बुधवार दि. 15 असे दोन दिवस ही यात्रा भरविण्यात येणार
आहे.मंगळवारी सकाळी ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर देवीची मिरवणूक व पडल्या भरण्यात येणार आहेत. सायंकाळी प्रसादाचेही आयोजन केले आहे. त्याच दिवशी सांगली येथील लक्ष्मी ब्रॉसबॅण्ड कंपनी व न्यू दरबार ब्रॉसबॅण्ड कंपनी श्री शिन्नोळी (कराड-सातारा) यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारीही सायंकाळी देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले आहे.