प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनने गवाळी या दत्तक खेडय़ात शालेय विद्यार्थ्यांना दफ्तर वितरणाचा स्तुत्य उपक्रम राबविला. कणकुंबीच्या दुर्गम जंगल भागात असलेल्या या खेडय़ातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले. या ठिकाणी इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. या भेटीमुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
मुख्याध्यापक श्यामराव जाधव व सहशिक्षक किशोरकुमार शितोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून लोकमान्य सोसायटी व लोककल्प फौंडेशनचे आभार मानले. संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर व उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी बी. ए. देसाई, संतोष गावकर, ग्रा. पं. सदस्या संजना गावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी फौंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.