मुंबई
फूड डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत झोमॅटोचा समभाग शेअर बाजारात शुक्रवारी 8 टक्के इतका तेजीत पहायला मिळाला. सकाळच्या सत्रात इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग वाढीसह 73 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य शुक्रवारी 62 हजार कोटी रुपयांवर गेले होते. ओएनडीसी अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन धोरणात लवकरच स्वागतार्ह बदल होणार आहेत. या बातमीचा परिणाम समभागावर झालेला पहायला मिळाला.