निवृत्त पोलिस अधिकारी संतोबा देसाई यांचा उपक्रम
प्रतिनिधी / फोंडा
मरावे परी कीर्तीरूपे उरावे… असा उपक्रम पीपल ऑफ फोंडाच्या सहकार्याने समाजसेवक संतोबा देसाई यांनी हाती घेतला आहे. मानवी शरीराचा निरोप घेतल्यानंतर मृतदेहावर अंत्य संस्कारासाठी लागणारी अंत्यविधी सामुग्री फोंडा येथील डीके आर्कडच्या तळमजल्यावर राज्यातील सर्वासाठी विनामुल्य उपलब्ध करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. कोरोना काळात पीओपीच्या सहाय्याने त्यांनी सुमारे 41 हजार मजूरांना नित्यनेमाने जेवणाची व्यवस्था करण्योत हीरीरीने पुढाकार घेतला आहे.
काल शनिवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पिपल ऑफ फोंडाचे पदाधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी माहिती देताना ज्या समाजाने मला भरभरून प्रेम दिले, त्या समाजातील प्रत्येक घटक आनंदी असावा आपली उतारवयातील इच्छा आहे. आपल्या श्री संतोबाराव चेरीटेबल ट्रस्टतर्फे तसेच इतर अडल्यानडल्यांना आपल्या कुवतीनुसार आपण मदत करत असल्याचे सांगितले. अठय़ाहत्तरीत झुकलेल्या तरूणासारखा उत्साह असलेल्या समाजसेवकांने अनेकाने मदत केली आहे. त्याच्याकडून मदत मिळालेले युवक उच्च पदावर काम करीत आहे. आज त्यानीही आपल्यासारखे सामाजिक दायित्व ओळखून तेही समाजासाठी काम करीत असल्याचे चित्र पाहिल्यानंतर मदत सार्थ झाल्याचा आनंद त्याना मिळत असल्याचे ते म्हणाले.
फेंडा व मडगांव पोलिसांना पुरविणार अंत्यविधी सामुग्री
स्वतः पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यामुळे त्यांना बेवारसी मृतेदेहाबाबत माहिती आहे. अशा बेवारसी मृतदेहावर कपडा व विल्हेवाटीचा खर्च त्या तपास अधिकाऱयावर पडत असते, याची दखल घेत सर्व अंतिमसंस्कार सामुग्री विनामुल्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत विविध खूनप्रकरणी व इतर बेवारस मृतदेह आणताना पोलिसांना कपडा उपलब्ध व्हावा यासाठी फोंडा पोलिस स्थानक व मडगांव पोलिस स्थानक यांना पंचवीस कापडाचा एक गट्टा सुपुर्द करण्यात आला. अंतिमसंस्कार सामुग्रीची शोधाशोधीसाठी वेळ न दवडता सरळ फोंडा जुने बसस्थानक येथील डीके आर्कड तळमजला गाठून पदरमोडीचा खर्च न करता विनामुल्य उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोबा देसाई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पीओपी संस्थेशी तसेच तुकाराम नाईक खडपाबांध 0832-2319172, प्रमोद सावंत 9822125595, गोकुळदास नार्वेकर फोंडा 9403273705, विपीन सिरसाट 9503916365 यांच्यांशी संपर्क साधण्याचे कळविले आहे.