ऑनलाइन टीम / मुंबई :
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने या कारवाई करीत तीन तरुणींची सुटका केली. यामधील एक तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या तिघी टीव्ही मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एका महिला दलालास अटक केली.
आरोपी महिला कांदिवली पूर्वेला टुर्स ऍण्ड ट्रव्हल एजन्सी चालवत होती. अनेक बेकायदेशीर गोष्टींमध्ये तिचा सहभाग होता, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.