प्रतिनिधी/ बेळगाव
अज्ञात वाहनाच्या ठोकरीने पादचाऱयाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री बेळगाव-खानापूर रोडवरील चौगुलेनगर, मच्छे येथे ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मारुती लक्ष्मण हळब (वय 28, मूळचा रा. सागरे, ता. खानापूर, सध्या रा. लक्ष्मीनगर, मच्छे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मारुतीच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. तो भाजी मार्केटमध्ये भाजीविक्री करत होता. शुक्रवारी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास बाहेर जाऊन येण्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. चालत जात असताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या डोक्मयाला व पायाला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.