नवी दिल्ली
भरती प्रक्रियेत कार्यरत स्टार्टअप कंपनी अपना आता युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आहे. सदरच्या कंपनीचे मूल्य 1.1 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहचले आहे. सदरची कामगिरी कंपनीने अवघ्या 21 महिन्यात केली असून या स्टार्टअपची स्थापना ऍपलचे माजी कार्यकारी निर्मीत पारीख यांनी केली आहे. कंपनीत 1 लाख 50 हजार कर्मचारी काम करत आहेत.