प्रचंड हानीमुळे आणीबाणी घोषित
@ वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेच्या केंटकीसह अनेक भागांमध्ये वादळाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. या वादळामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू ओढवला आहे. केंटकीचे गव्हर्नर एंडी बेशियर यांनी प्रांतात आणीबाणी घोषित केली आहे. बचावपथके प्रभावित क्षेत्रात असून मदत तसेच बचावकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेफील्ड भागात मेणबत्तीच्या कारखान्याला वादळामुळे मोठे नुकसान पोहोचले आहे. वादळ या कारखान्याला धडकले, तेव्हा तेथे 100 हून अधिक जण काम करत होते. या कारखान्याच्या कोसळलेल्या भागात काही जण अडकून पडल्याचा संशय आहे.
मिसौरीमध्ये सेंट चार्ल्स आणि सेंट लुइस काउंटीमध्ये काही हिस्स्यात 112 मैल प्रतितासाच्या वेगाने वारे वाहिले आहेत. ऑगस्ट आणि मिसौरीमध्ये अनेक घरे कोसळल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री वादळ अरकंसास येथे धडकल्यावर ते मेफील्डपासून केंटकीपर्यंत पोहोचले. वादळ शनिवारी सकाळी पश्चिम केंटकीपासून प्रांताच्या दक्षिण हिस्स्याच्या दिशेने सरकत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.