नवी दिल्ली
अर्बन कंपनीने जवळपास 1,857 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या रक्कमेचा वापर कंपनी नवं संशोधनासह इतर कारणांसाठी करणार असल्याचे समजते.त्याचप्रमाणे कंपनी आपला आयपीओही येत्या 18 ते 24 महिन्यात आणण्याचा विचार करते आहे. सदरची उभारलेली रक्कम नवं संशोधन, उत्पादन विकास, दर्जात्मक सुधारणांसाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव खर्च केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. येणाऱया काळात कंपनी आपल्या भागीदारांना प्रशिक्षीत करण्याचा विचार करते आहे. अभियांत्रिकी विभाग अधिक मजबूत करण्याचा विचारही कंपनी करत असून त्यांच्यामार्फत इतर देशांना सेवा देण्याचा प्रयत्न येत्या काळात होणार आहे.