वार्ताहर /थिवी
थिवी मतदारसंघातील अस्नोडा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सरपंचाच्या निवडणुकीत रोशनाली कवळेकर या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. सरपंचपदासाठी रोशनाली कवळेकर यांचा एकच अर्ज आल्यामुळे निर्वाचन अधिकारी मनोहर परवार यांनी रोशनाली कवळेकर यांना सरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले. अस्नोडा पंचायतीमध्ये एकूण 9 प्रभाग असून यावेळी सरपंचा रोशनाली कवळेकर, उपसरपंचा छाया बिचोलकर, माजी सरपंच शंकर नीक, प्रवीण बुगडे, शैलेश साळगांवकर तसेच पंचायत सचिव चंदन चोडणकर उपस्थित होते. त्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत केली. सरपंचाची निवड झाल्यावर थिवीचे माजी आमदार तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर व कोलवाळ यांनी नवनिर्वाचित सरपंचा रोशनाली कवळेकर यांचे फुलांचा हार घालून पुष्पगुच्छ दून अभिनंदन केले.