नवी दिल्ली/प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस अधिकच महाग होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग ९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. आज दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज डिझेलच्या किंमतीत ३५ पैसे प्रति लिटरने वाढ करण्यात आली आहे.
IOCL च्या वेबसाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.८४ रुपये आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत आज डिझेलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.