वडूज
तुपेवाडी (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशिल शिक्षीका व नवोदित साहित्यीक आराधना संतोष गुरव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा साहित्यरत्न गौरव पुरस्कार 2020 जाहिर झाला आहे. 30 डिसेंबर रोजी पुणे येथे या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण होणार आहे. सौ. गुरव यांचे ‘ कधी कधी, वर्तुळ, श्वास, प्राजक्त ’ हे चार काव्यसंग्रह तर कोंदण चारोळी संग्रह प्रसिध्द झाले आहेत. तर आनंदाचे गाणे, हा लेख संग्रह चांदन झुला हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यापूर्वी त्यांना 2017 मध्ये समाजभूषण पुरस्कार खटाव, 2019 मध्ये राष्ट्रीय शिक्षणरत्न, 2020 मध्ये त्रिलोक्य साहित्य महात्मा फुले सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल सौ. गुरव यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.