मुंबई
आर्सेलर मित्तल कंपनीच्या नव्या सीईओपदी आदित्य मित्तल यांची नियुक्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कंपनीचा खर्च कमी करण्याबरोबरच 20 टक्के कर्मचारी कमी करण्याची योजना आखण्यात आली असल्याचे समजते. लक्ष्मी मित्तल यांनी 1976 मध्ये कंपनीची स्थापना केली होती जे आता एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी व कार्यकारी मंडळावर राहात सेवा बजावणार आहेत. सीईओ आदित्य मित्तल हे सीईओ म्हणून यापुढे कंपनीची धुरा सांभाळतील. जगातील सर्वाधिक पोलाद निर्मिती कंपनी म्हणून आर्सेलर मित्तलची ओळख आहे. आदित्य यांनी 1997 मध्ये कंपनीत प्रवेश मिळवला आहे. तो आपली जबाबदारी समर्थपणे पेलत असल्याचे लक्ष्मी मित्तल यांनी सांगितले.