वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंग झोयू येथे होणाऱया आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा ग्रॅण्डमास्टर तसेच पाचवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंदची भारतीय बुद्धिबळपटूंसाठी मेंटरपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने दिली.
चीनमधील होणारी ही आशियाई क्रीडास्पर्धा 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या क्रीडाप्रकाराचे पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळपटूंच्या चमूमध्ये विदित गुजराथी, पी. हरीकृष्णा, निहाल सरीन, एस.एल. नारायणन, के. शशीकिरण, बी. अधिबन, कार्तिकयन मुरली, अर्जुन, अभिजित गुप्ता, सुर्यशेखर गांगुली त्याचप्रमाणे महिला विभागात कोनेरू हंपी, डी. हरीका, आर वैशाली, तानिया सचदेव, भक्ती कुलकणौ, वंतिका अगरवाल, मेरी ऍन गोम्स, सौम्या स्वामीनाथन आणि इशा करवडे यांचा समावेश आहे. आशियाई क्रीडास्पर्धेतील बुद्धिबळ प्रकाराला 11 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा दोन फॉर्मेटमध्ये खेळविली जाईल.r