ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना लखनऊस्थित बहुखंडी निवासस्थानी नजरकैद करण्यात आले आहे. एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा लल्लू यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांना घराबाहेर जाण्यास अनुमती नाही. अजयकुमार यांच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
उत्तरप्रदेशात महिला असुरक्षित आहेत. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सरकारविरोधातला विरोधी पक्षांचा आवाज दाबायचा आहे. त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असे अजयकुमार यांनी म्हटले आहे.