अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बॉलिवूडमध्ये स्वतःच्या बोल्डनेससह तंदुरुस्तीसाठी ओळखले जाते. चित्रपटांसोबत सोशल मीडियावर ती सक्रीय असते. उर्वशीला संयुक्त अरब अमिरातकडून (युएई) गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. गोल्डन व्हिसा मिळाल्याने उर्वशी आता युएईत पुढील 10 वर्षांपर्यंत वास्तव्य करू शकते.
मला आणि माझ्या कुटुंबाला गोल्डन व्हिसा देण्यात आल्याने युएई सरकार, त्याचे शासक आणि लोकांचे आभार मानते असे उर्वशीने म्हटले आहे. उर्वशीर्पी संजय दत्तला हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.
गोल्डन व्हिसा मिळाल्यावर युएईत दीर्घकाळापर्यंत वास्तव्य करण्याची अनुमती मिळते. हा व्हिसा गुंतवणूकदार, उद्योजक, संशोधक, वैद्यकीय तज्ञ, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना मिळत होता. पण अलिकडच्या काळात बॉलिवूडच्या कलाकारांना देखील हा व्हिसा देण्यात येत आहे.