ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत असलेल्या एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान यांना समन्स बजावण्यात आले आहेत. आगामी तीन दिवसांत सर्वांना चौकशीसाठी यावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती जया सहाची मॅनेजर करिश्माचे एक व्हाट्सअप चॅट मिळाले आहे. त्यामध्ये ड्रग्जच्या देवाण-घेवाणविषयी चर्चा केली आहे. या चॅटमधील D म्हणजे दीपिका असे नाव समोर आले आहे. यावेळी व्हाट्सअपवर बोलत असताना दीपिकाने ड्रग्ज मागवले होते.
दीपिका, सारासह श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रित सिंह यांना देखील समन्स बजावले आहेत. श्रुती, रकुल आणि सिमॉन यांना 24 सप्टेंबरला म्हणजे उद्याच चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दीपिका पदुकोणला 25 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना 26 सप्टेंबरला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान, सर्वात पहिल्यांदा सारा अली खानचे नाव घेतले होते. तसेच या प्रकरणात रिया सोबत अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सध्या रिया न्यायालयीन कोठडीत आहे.