वृत्तसंस्था/ मियामी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या क्लेकोर्टवरील चार्लस्टन खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सिडेड ऍश्ले बार्टीने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना शेल्बी रॉजर्सचा पराभव केला.
गुरुवारी झालेल्या तिसऱया फेरीतील सामन्यात बार्टीने रॉजर्सचा 7-6 (7-3), 4-6, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात स्पेनच्या बेडोसाने अमेरिकेच्या मॅकनेलीवर 6-3, 6-3 अशी मात केली. बार्टी आणि बेडोसा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. माँटेनेग्रोच्या बिगर मानांकित कोव्हिनिकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना झेक प्रजासत्ताकच्या क्विटोव्हाचा 6-4, 6-1, कझाकस्तानच्या पुतीनसेवाने स्पेनच्या मुगुरुझाचा 6-0, 2-2 असा पराभव केला. दुखापतीमुळे मुगुरुझाने हा सामना अर्धवट सोडला. अमेरिकेच्या गॉफने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना आपल्याच देशाच्या लॉरेन डेव्हिसचा 6-2, 7-6 (7-2), टय़ुनेशियाच्या जेबॉरने फ्रान्सच्या कॉर्नेटचा 5-7, 6-3, 6-3 असा पराभव केला.