नवी दिल्ली
ओप्पो इंडिया कंपनीने आपल्या संशोधन व विकास क्षेत्रात इंजिनियर्सना प्रशिक्षीत करण्यासाठी बिटस् पिलानी यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी ओप्पो इंडियाने बिटस् पिलानी यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीतून बिटस पिलानी विविध अभ्यासक्रमांसह तांत्रिक ज्ञानाचा अनुभव उमेदवारांना मिळवून देणार असल्याचे ओप्पो इंडियाने म्हटले आहे.