38 कोटींचा नफा, उत्पन्नात वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओरिएंट इलेक्ट्रिकचा डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिसऱया तिमाहीतील निव्वळ नफा हा 26.7 टक्क्यांनी घटून 38.8 कोटी रुपयांवर राहिला आहे. ज्यामध्ये किमतीमधील वृद्धीमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाल्याची माहिती आहे.
सीके बिर्ला समूहातील या कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2020-21 मध्ये 51.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. तर दुसरीकडे कंपनीचे उत्पन्न हे 9.7 टक्क्यांनी वाढून 678.35 कोटी रुपयांवर राहिले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत 618.34 कोटी रुपयांवर राहिले होते. तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण खर्च 628.31 कोटी रुपये होता, जो ऑक्टोबर ते डिसेंबर 2020-21 च्या दरम्यान 549.58 कोटी रुपयांपेक्षा 14.33 टक्के अधिक राहिला आहे.