प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटी योजनेंतर्गत बेळगाव येथील सदाशिवनगर येथील विश्वेश्वरय्यानगरमध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या अत्याधुनिक सुविधा आणि संगणक प्रणालींनी सुसज्ज असलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवार दि. 29 रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते होणार आहे.
कमांड अँड कंट्रोल सेंटर प्रकल्पाकरिता 80 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारत इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या कंपनीला 46 कोटीला निविदा मंजूर करण्यात आली होती. विविध विभागांना जोडणारी आणि त्यांच्या कार्याची माहिती नागरिकांना एका छताखाली उपलब्ध होणार आहे. ही यंत्रणा कमांड ऍन्ड कंट्रोल केंद्रामार्फत पुरविली जाणार आहे जेणेकरून जनतेला आपत्कालीन परिस्थितीवेळी योजनेंतर्गत तातडीने आवश्यक सेवा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही तक्रारीची दखल या प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.
शहरात 1,20,000 घरे असून सर्व घरांना आरएफआयडी बसविण्यात आली असून टॅगद्वारे घरातील कचऱयाची उचल झाली की नाही याची माहिती पेंद्राला मिळणार आहे. कचरा कुंडीतील कचऱयाची उचल झाली नसल्यास त्याची माहितीही या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. कचरा उचलीची माहिती गोळा करणे, कचऱयाची विल्हेवाट लावणे, कचरा वाहन ऑनलाईन ट्रकिंग, रस्ता ऑप्टीमायझेशन आणि कचऱयाचे वजन व कचरा विल्हेवाट लावणाऱया वाहनांच्या फेऱयांचा तपशील केंद्राला उपलब्ध होणार आहे. कचरा टाकण्यास बंदी घातलेल्या ठिकाणी कचरा टाकल्यास त्याची माहिती घेण्यासाठी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
स्मार्ट पोल खांब शहरातील प्रदूषणाची आणि हवामानाची अचूक माहिती देणार आहेत. शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या बटणाद्वारे महिलांना तातडीने मदत मिळणार आहे. या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लाऊडस्पीकर सुविधादेखील आहे, जी संकटात असलेल्यांना आवाज व सोई देण्यासाठी संबंधित विभागीय कर्मचाऱयांसाठी वापरली जाऊ शकते. कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे वाहतुकीवर सहज नियंत्रण ठेवता येईल, यासाठी शहरातील रहदारी नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. बोर्ड डिस्प्लेच्या माध्यमातून जनतेला बसेसची माहिती आणि कोणत्या मार्गावर बस आहे, हे कळू शकते.
नागरिकांना बसचा मार्ग आणि वेळेची माहिती सिटीझन ऍपद्वारेदेखील मिळू शकते. बसमध्ये सार्वजनिक माहिती प्रणाली (पीआयएस) बसविली गेली आहे, जेणेकरून प्रवाशांना स्टेशनची माहिती मिळू शकेल.