उपाध्यक्षपदी शपुंतला गस्ती यांची निवड
कणकुंबी : कणकुंबी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी कणकुंबी गावचे रमेश खोरवी यांची तर उपाध्यक्षपदी शकुंतला शंकर गस्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी ग्राम पंचायतीचे सर्व सातही सदस्य उपस्थित होते. कणकुंबी ग्राम पंचायतीचे अध्यक्षपद सामान्य पदासाठी होते. त्यासाठी रमेश खोरवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तसेच उपाध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने या जागेसाठी सुद्धा कणकुंबी गावच्या श्रीमती शकुंतला गस्ती यांचाही एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे अखेर अध्यक्ष म्हणून रमेश खोरवी तर उपाध्यक्ष म्हणून श्रीमती शकुंतला गस्ती यांच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱयांनी केली. यावेळी कणकुंबी गावच्या सदस्या सौ. आरती नाईक, सौ. दिप्ती गवस व सौ. निलीमा महाले तसेच चिगुळे गावचे पंचायत सदस्य रामनाथ चौगुले व सौ. सुप्रिया हरिजन आदी सर्व सदस्य उपस्थित होते.