बेंगळूर/प्रतिनिधी
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवकुमार नुकतेच कोरोनावर मत करत घरी परतले होते. पण गुरुवारी त्यांना ताप आल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवकुमार यांना उपचारासाठी जयनगरमधील रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयात किंवा घरी न येण्याचे आवाहन केले आहे. शिवकुमार यांनी म्हटले आहे, ते काही दिवस रुग्णालयात दाखल असणार आहेत त्यामुळे कुणीही घरी आणि हॉस्पिटलमध्ये येऊ नये असे आवाहन केले आहे.
डी. के. शिवकुमार यांना २४ ऑगस्ट रोजी कोरोना झाल्याने राजानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून ३१ ऑगस्ट रोजी कोरोनातून बरे झाल्याने घरी परतले होते. आता त्यांना पुन्हा ताप आल्याने रुग्णालयात दाखल केलं आहे.