बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस पक्षाने नेते एच. डी. कुमारस्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विटरवर माहिती देत सांगितले.
“कुमारस्वामी यांनी गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला मी स्वत: ला वेगळे करून चाचणी घेण्याची विनंती करतो,” असेत्यांनी ट्विट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुमारस्वामी हे आज होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त होते. ते बसव कल्याणमध्ये पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करत होते. २३ मार्च रोजी कुमारस्वामी यांनी कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतला होता.