ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) शहीद झाले.
बारामुल्लातील क्रेझरी भागात हा हल्ला झाला. हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
आठवडाभरात सुरक्षा दलांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगरमधील नवगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते.