काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्हय़ामधील ओखू गाव झेलम नदीच्या काठावर स्थित आहे. या गावात सॉल मिल्सचे प्रमाण अधिक आहे. या धूळयुक्त गावात केवळ 250 लोक राहत असले तरीही हे देशभरात ‘पेन्सिल गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात स्लेट निर्मितीचे तीन उद्योग असून जे पेन्सिल निर्मितीसाठी कच्च्या मालाप्रमाणे वापरले जाते.
या गावात स्लेट निर्मितीचा पहिला प्रकल्प 2013 मध्ये स्थापन करण्यात आला होता. झेलम ऍग्रो इंडस्ट्रीजपूर्वी येथील लाकूड जम्मू आणि चंदीगडला पाठविण्यात येत होते. आता गावातील बहुतांश लोक पेन्सिलसाठी कच्च्या मालाची निर्मितीचे काम करत आहेत. त्यांच्याकडून पुरविण्यात येणारा कच्चा माल उत्तम दर्जाचा आणि स्वस्त होता. यानंतर येथेच पेन्सिल स्लेट तयार करण्याचा विचार समोर आला आणि त्यासाठी प्रकल्पही स्थापन करण्यात आला. ही स्लेट लाकडाची एक पट्टी असते, ज्याद्वारे चार पेन्सिल्स तयार केल्या जाऊ शकतात. आता पूर्ण गाव पेन्सिल स्लेट निर्मितीचे काम करत आहे.
विशेष प्रकारचे लाकूड
पेन्सिलसाठी कच्चा माल म्हणून काश्मीरच्या पोपलार वृक्षांचे लाकूड अत्यंत उपयुक्त असते, ज्याला चिनार देखील म्हटले जाते. चिनारची झांड काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणात आहेत. याचबरोबर बुल्गेरियन लाकूडही वापरले जाते, ज्याला रशियन चिनार म्हटले जाते. परंतु हा वृक्ष अत्यंत कमी ठिकाणी आढळून येतो. चिनारचे लाकूड फारसे टणक नसते.
महिलांना रोजगार
एका उद्योगात 100 जण काम करतात आणि यातील बहुतांश महिला आहेत. स्लेटच्या लाकडाची ओळख पटविण्याचे काम महिलांकडून केले जाते. ओखू गावातच पूर्ण पेन्सिल निर्मिती शक्य असून याकरता शासकीय मदतीची अपेक्षा करत आहोत असे पेन्सिल स्लेट निर्मात्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मन की बात या कार्यक्रमात ओखू गावाचा उल्लेख केला आहे.