वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम
इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया केरळ ब्लास्टर्स एफसी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सर्बियाच्या इव्हान वुकोमॅनोविच यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्बियाच्या वुकोमॅनोविच यांना फुटबॉल प्रशिक्षण क्षेत्रातील बऱयाच वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी बेल्जियम, स्लोव्हाकिया आणि सायप्रस येथील फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील विविध फुटबॉल क्लबना मार्गदर्शन केले आहे. 43 वर्षीय वुकोमॅनोविच यांनी 2013-14 या कालावधीत आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीला बेल्जियममध्ये प्रारंभ केला. आगामी इंडियन सुपलिग फुटबॉल हंगामात केरळ ब्लास्टर्सला आता वुकोमॅनोविच यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वुकोमॅनोविच यांनी आपल्या 15 वर्षांच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे.