ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत वाढत एक लाखाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 47 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 99 हजार 930 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 99,930 रुग्णांपैकी 75 हजार 409 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 807 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 21,661 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 15 लाख 99 हजार 134 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 661 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 475 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 59 जण व्हेंटिलेटरवर आहेत.