प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा तालुक्यात सर्वपक्षीय पुकारलेल्या दि. ११ ते २० सप्टेंबर या दहा दिवसात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व पक्ष, व्यापारी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेल्या कोडोली येथे सर्वच व्यवहार बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता.
कर्फ्यूला शुक्रवारी प्रारंभ झाल्यावर तालुक्यात सर्वत्र प्रतिसाद मिळत शांततेत सुरुवात झाली. आ. विनय कोरे, आ. पी.एन. पाटील यांच्या सहमतीने सर्वच पक्ष, व्यापारी, संस्था यानी दहा दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू करण्याचे ठरवले होते, पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी शिंदे, सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, पन्हाळा नगरपालिका यांच्या माध्यमातून तसेच व्यापारी असोसिएशनच्या सहकार्याने व ग्रामस्थांचा पiठींबा यामुळे हा कर्फ्यू शांततेत सुरू झाला आहे.