धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदीच्या वस्तूंची खरेदी तेजीत : आज होणाऱया लक्ष्मी पूजनासाठी जय्यत तयारी
वार्ताहर / खानापूर
गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे त्रस्त झालेला शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक दिवाळी सणाच्या उत्सवाला उत्सुक झाला आहे. पारंपरिक असणारा सुगीतील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय. शुक्रवारपासून सुरू झालेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी खानापूरच्या बाजारात एकच गर्दी झाली होती.
विशेषत: आकाश कंदील, पणत्या, रांगोळी आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचे विशेष लक्ष होते. तसेच धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झाली होती. फराळ खरेदीसाठीही गर्दी होती. प्रत्येकाच्या घरोघरी लक्षवेधक दिव्यांनी निर्माण होणाऱया चैतन्याची दिवाळी अर्थात लक्ष्मीपूजन शनिवारी आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून या उत्सवाला प्रारंभ होतो. परंतु यावषीचा दिवाळीचा सण तिथीप्रमाणे तीनच दिवस आहे. त्यामुळे शनिवारी नरकचतुर्दशी तसेच दीपावली असा संयुक्त उत्सव साजरा केला जाणार आहे.
गेल्या आठवडाभरापासून खानापूर तालुक्मयात सुगीच्या हंगामाला जोर आला आहे. कोरोनामुळे पावसाळय़ातील सर्व सणवारांवर विरजण आले होते. पण गेल्या पंधरवडय़ापासून तालुक्मयात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दिवाळी सणाला उधाण आल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीचा सण म्हणजे सुगीचा सण मानला जातो. यावषी पावसाने एकच कहर केल्याने नवरात्रीपासून सुगीच्या तयारीला शेतकरी लागला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात पावसाने विश्रांती घ्यावी, अशी शेतकरीवर्ग अपेक्षा करत आहे.
बाजारपेठेत दिवाळीसाठी फुले, मूर्ती व फळांची दुकाने सजली आहेत. खानापूरच्या बाजारात शुक्रवारी एकच गर्दी झाली होती. दिवाळीसाठी लागणाऱया मातीच्या पणती तसेच रांगोळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. खानापूर तालुक्मयामध्ये दिवाळीचा सण मोठय़ाने व उत्साहात साजरा केला जातो. या सणावेळीच सुगीचे हंगाम असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दिवाळी साजरी करत सुगीलाही अधिक महत्त्व
देतात.
बालचमूंनी साकारले गड-किल्ले
दिवाळीचा सण आला की ग्रामीण भागामध्ये किल्ले उभारणीसाठी बालचमूंची लगबग सुरू असते. त्यामुळे बऱयाच गावांमध्ये गड-किल्ले साकारण्यात आले आहेत.
लक्ष्मीपूजनाची तयारी… शनिवारी उटणे लावून अभ्यंगस्नान करून या उत्सवाचे स्वागत केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकांनी सुवर्णकारांकडे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी केली. घरोघरी दारापुढे लक्षावधी दिव्यांची आरास शनिवारीपासून दिसून येणार आहे. शनिवार दिवाळीचा मुख्य दिवस असून लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने व्यावसायिकांनी सकाळच्या सत्रातच लक्ष्मीपूजनाचे आयोजन केले आहे. तसेच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पावसाचीही धास्ती आहे. सोमवारी पाडवा असल्याने या दिवशीही अनेकजण लक्ष्मीपूजन करतात.