ऑनलाइन टीम / रोम :
इटलीमध्ये अवघ्या दोन महिन्याची चिमुकली कोरोना मुक्त झाली आहे. तिला व तिच्या आईला 18 मार्चला कोरोना ची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही इटली मधील सर्वात पहिली कोरोना मुक्त झालेली मुलगी आहे असे तेथील स्थानिक वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुकली मध्ये आता कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून येत नाही आहेत. ती पूर्णपणे कोरोना मुक्त झाली आहे. त्याच बरोबर तिच्या आईची ही प्रकृती स्थिर असून तिला ही घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, इटलीत कोरोनामुळे आत्तापर्यंत 17, 669 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. आता सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजून काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर विचार करत आहे.