प्रतिनिधी / सातारा :
औरंगाबाद येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील खेलो इंडिया राज्य अजिंक्यपद बास्केट बॉल स्पर्धेसाठी सातारा येथील के एस डी शानबाग विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या बास्केटबॉल खेळाडूंची निवड झाली असून या स्पर्धेसाठी हे खेळाडू औरंगाबाद येथे गेले आहेत.
ज्यू. कॉलेज व विद्यालयाच्या वतीने 18 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये अविष्या विकास गुरव कु .साक्षी संतोष किर्दत, कु. प्रांजली उद्धव पवार या 12 वितील विज्ञान शाखेच्या तर इयत्ता दहावी ब मधिल पूर्वा अजित केंजळे यांची निवड झाली असून अठरा वर्षाखालील मुलांमध्ये श्रिजित अजय फाळके इयत्ता दहावी अ या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे .
हे सर्व खेळाडू कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीमध्ये देखील रोज दोन तास नियमितपणे बास्केटबॉल खेळाचा सराव करीत होते. या खेळात कशी सुधारणा करता येईल याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या यासाठी या खेळाडूंच्या पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. या सर्व खेळाडूंना राज्य बास्केटबॉल प्रशिक्षक व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अभिजीत दिलीप मगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना बास्केटबॉल प्रशिक्षक शंकर गायकवाड यांनी सहकार्य केले.
ही सर्व महाविद्यालयीन व शालेय मुले मुली येत्या 17 डिसेंबर अखेर होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झाली असून ती निश्चितच यश मिळवतील, असा विश्वास महाविद्यालय व शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.