प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरा करावा याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 17 रोजी दुपारी 4 वा. बैठक आयोजित करण्याचे ठरले.
गणेशोत्सव साधेपणाने व कोरोना नियमावलीचे पालन करून साजरा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक गुरूवारी आयोजित केली होती. यावेळी विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पण सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांना विश्वासात घेऊन ठोस निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मंडळाच्या वतीने महामंडळाकडे सूचना मांडण्यात येतील असे काही मंडळाच्या पदाधिकाऱयांनी सूचविले. याकरिता पुन्हा बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण – पाटील, उपाध्यक्ष प्रकाश मरगाळे, सतिश गौरगोंडा, मदन बामणे, चिटणीस गणेश दड्डीकर, महादेव पाटील, शुभम शेळके, सागर पाटील, आदिंसह महामंडळाचे पदाधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.