ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाने आतापर्यंत आठ लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. जगात 2 कोटी 33 लाख 80 हजार 569 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 8 लाख 08 हजार 697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 59 लाख 07 हजार 856 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 66 लाख 64 हजार 016 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 61 हजार 715 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 58 लाख 41 हजार 458 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 80 हजार 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृतांची संख्या आहे. ब्राझीलमध्ये 35 लाख 82 हजार 698 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 14 हजार 277 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलनंतर मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. मेक्सिकोत 5 लाख 56 हजार 216 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 60 हजार 254 जण दगावले आहेत.