प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाचे 631 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ तर 18 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामुळे एकूण रूग्णांची संख्या आता 44 हजार 09 इतकी झाली आह़े तर रूग्णांची वाढती संख्या व वाढलेला मृत्यूदर यामुळे आरोग्य यंत्रणेच्या समोरील चिंता वाढल्या आहेत़
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिह्यात 4 हजार 566 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 408 तर ऍन्टीजेन चाचणीत 176 तर मागील 47 असे 631 कोरोनाबाधित रूग्ण मिळून आल़े तर मागील 24 तासांमध्ये 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 519 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 3.45 इतका असून पॉझिटिव्हीटी रेट 17.41 इतका आह़े