नवी दिल्ली
जेएसडब्ल्यूच्या कच्च्या पोलादाच्या उत्पादनात गेल्या तिमाहीत मोठी घट झाली आहे. जेएसडब्ल्युच्या विजयनगर येथील कारखान्यातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीचे एप्रिल ते जून या तिमाहीतील कच्च्या पोलादाचे उत्पादन 2.96 दशलक्ष टन इतके झाले होते. मागच्या वषी याच कालावधीत 4.24 दशलक्ष टन इतके पोलाद तयार करण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2020मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान 3.97 दशलक्ष टन इतके कच्चे पोलाद उत्पादन घेण्यात आले. पोलादाची सरासरी वापर क्षमता 76 टक्क्याने जूनमध्ये घटली होती. विजयनगर मधील उत्पादन कारखान्यात काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तेथे उत्पादन कमी घेता आले आहे. गेल्या दोन वर्षात कच्च्या लोहखनिजाच्या सरासरी उत्पादनावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.