तिसऱया पक्षी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
वाळपई प्रतिनिधी
जैवविविधता समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम-घाट परिसराचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे. यामुळे या भागातील नैसर्गिक संपत्ती आजही सवर्धित झालेली असून यातील पक्षी हा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. पक्षी महोत्सवाच्या माध्यमातून ा भागातील जैवविविधता खऱया दृष्टिकोनातून समृद्ध असल्याचे सिद्ध झालेले आहे .त्यामुळे पक्षी महोत्सव हा गोव्यापुयापुरती मर्यादित न राहता त्याला राष्ट्रीय स्वरूपाचे दर्जा प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून सरकार निश्चितपणे विचार करणार आहे.
त्याचबरोबर मानव व रानटी जनावर येथील संघर्ष विकोपाला पावला असून येणाऱया काळात वनखात्याने दोन्ही दरम्यानचे संबंध सौहार्दपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे .वनखात्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला तिसऱया पक्षी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रम वन प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी पक्षी असलेला पोस्ट खात्याचे पाकीट मान्यवरांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर वनखात्याचे प्रमुख वनपाल सुभाष चंद्र अतिरिक्त वनपाल संतोष कुमार पोस्ट खात्याचे महाराष्ट्राचे प्रमुख विनोद कुमार ह्यांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रमोद सावंत यांनी अशा महोत्सवांमध्ये स्थानिकांना सहभागी करून घेणे अत्यंत गरजेचे असून तसे झाल्यास येथील वनसंपदेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची मदत होणार आहे.
फिल्म शुटीगसाठी उपयोग करा.
पक्षी महोत्सव हा जैवविविधता चा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम आहे.येथील समृद्ध.वनराई फिल्म चित्रिकरणासाठी वापर करा असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बोलताना येथील वनसंपदा हे पूर्णपणे समृद्ध असल्याचे आतापर्यंत सिद्ध झालेले आहे. येथील निसर्ग सौंदर्य हे अनेक दृष्टिकोनातून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्यामुळे याचा खऱया अर्थाने वापर फिल्मी चित्रीकरणासाठी झाल्यास त्याचा खऱया अर्थाने फायदा गोवा त्याचबरोबर स्थानिकांना प्राप्त होणार आहे. यामुळे यासाठी वनखात्याने प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले.म्हादई अभयारण्य त्याचप्रमाणे इतर अभयारण्याच्या माध्यमातून या ठिकाणी इको-टुरिझम विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारच्या माध्यमातून येणाऱया काळात प्रयत्न व्हावेत यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
जंगलामध्ये वनौषधी झाडांची लागवड करा
येणाऱया काळात वनखात्याचा प्रभाव अधिक परिणामकारक ठरावा यासाठी वनखात्याने आपल्या रानामध्ये वनौषधी झाडांची लागवड करावी व वैद्य व जंगल यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले
मानव व क्रांती जावा जनावरांमध्ये संघर्ष
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वाघांच्या मृत्यूचा सरळपणे उल्लेख न करता गेल्या काही वर्षापासून रानटी जनावर व मानव यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलेला आहे. यामुळे वाघांच्या मृत्यूची सारखी प्रकरणे घडू लागली आहेत. भविष्यात वनखात्याच्या यंत्रणेने रानटी जनावरे व मानव यांच्यामधील संबंध आपुलकीच्या दृष्टीकोनातून विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. अन्यथा येणाऱया काळात अशा प्रकारचा संघर्ष विकोपाला गेल्यास त्याचे गंभीर परिणाम जैवविविधता संभाळून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नुकसान होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
पक्षी महोत्सवाच्या माध्यमातून नैसर्गिक संपत्तीची प्रचीती
आज पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये जवळपास बाराशे पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आलेले आहेत. पैकी 475 प्रजाती ह्या गोव्यामध्ये आढळून आल्या असून त्यातील अडीचशे पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती पश्चिम घाटाच्या समृद्ध नैसर्गिक संपत्ती असल्याचे आतापर्यंत सिद्ध झालेले आहे .या पक्षी महोत्सवाच्या माध्यमातून या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची चांगली संधी प्राप्त होणार असल्याचे सांगून येणाऱया काळात गोव्यामधील निसर्गप्रेमी पर्यटक वाढण्याच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षी चिन्हाच्या पाकिटाचे विमोचन
दरम्यान महाराष्ट्रात पोस्टलचे यांना विनोद कुमार यांच्या प्रयत्नातून पक्षाचे चित्र असलेल्या पाकिटाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .यामुळे येणाऱया काळात मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होणार असून पक्षी संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी विनोदकुमार यांनी बोलताना स्पष्ट केले .दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार या पक्षी महोत्सवाला जागतिक स्तरावर पक्षीप्रेमी सहभागी झाले असून यात विविध राज्यातून 52 तर चाळीस विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहेत त्यात बरोबर सात आखाती देशातील पक्षीप्रेमीचा यामध्ये सहभाग आहे.
फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी विजेत्यांना बक्षिसे प्रदान
दरम्यान या संदर्भात गेले एक वर्षभर पक्षी निरीक्षण व त्यासंदर्भात फोटोग्राफी व विडिओग्रफी करणाऱया पक्षिप्रेमीसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. व्हिडिओ ग्राफी मधून ओमकार धारवाडकर तर फोटोग्राफी मधून शैलेंद्र नाईक याना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासंदर्भात प्राप्त झालेला निकालानुसार फोटोग्राफी मधून द्वितीय क्रमांक विपुल रेगे तिसरा क्रमांक ओमकार धारवाडकर तर उत्तेजनार्थ बक्षिसे अमोल काळे मयूर गावस प्रितेश गवस ओमकार धारवाडकर शैलेंद्र नाईक यांना प्राप्त झालेली आहेत.
व्हिडीओग्राफी मधील द्वितीय क्रमांक मयुर गावस तिसरा क्रमांक मिरजा?य मॅथ्य? तर उत्तेजनार्थ बक्षिसे विठ्ठल नाईक साहिल धुरी यांना प्राप्त झालेली आहेत. यावेळी अतिरिक्त वनपाल संतोष कुमार यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले.. वन खात्याचे प्रमुख वनपाल सुभाष चंद्र यांनी याप्रसंगी आपले विचार मांडताना पक्षी महोत्सवाच्या माध्यमातून येथील नैसर्गिक आपत्तींचा वेगळा अनुभव जगाला प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवा हा टेलिफिल्म प्रसारित करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दयानंद राव यांनी केले तर शेवटी उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वप्रथम पारंपरिक समई प्रज्वलित करून या पक्षी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी सादर केलेल्या सुंदर स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी डॉक्टर तर पूर्वी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सदर ठिकाणी वेगवेगळय़ा प्रकारचे स्टॉल्स खास भेट देऊन त्याची पाहणी केली व अनेक प्रकारच्या सूचना वनखात्याला केल्या.
सदर महोत्सव 18 व 19 असे आणखी दोन दिवस चालणार असून यावेळी सकाळी विविध पक्ष्यांच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती व संध्याकाळच्या सत्रात पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम होणार आहे.