जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कलाकार निर्माण करण्याचे काम डान्स स्कूल आजपर्यंत करत आले आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणात नृत्य शिकविणाऱया शाळा तसेच क्लासेस आहेत. क्लास घेण्यासाठी भाडोत्री जागा घेतली जाते. मात्र, आता लॉकडाऊनमुळे सर्व नृत्य शिकवणीवर्ग थांबले आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा इतरांप्रमाणे डान्स क्लास घेणाऱयांना तसेच शाळांमधील शिक्षकांना विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य डान्स स्कूल ओनर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नृत्यकला ही पारंपरिक आहे. त्या कलेला जपणे गरजेचे आहे. मात्र, जागांचे भाडे, वीजबिल भरताना आता आम्हाला त्रास होत आहे. कला जपायची असेल तर सरकारने आमच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता सर्व स्कूल व क्लासेस बंद आहेत. जर पुन्हा सर्व सुरू करायचे असेल तर पैशाची नितांत गरज आहे. त्यासाठी सरकारने डान्स स्कूल चालकांना आर्थिक मदत करण्याची गरज असून तातडीने ती मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा डान्स स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शेठ, किरण कांबळे, विवेक पाटील, करण गडकरी, सागर कलबुर्गी, रोहीत कुरंगी, विजय बस्सापुरी यांच्यासह इतर डान्स शिक्षक उपस्थित होते..