दिल्ली
डायरेक्ट-टू-होम(डीटीएच)सेवा प्रदान करणाऱया डिश टीव्हीने आपली सर्वसाधारण वार्षिक बैठक(एजीएम) एक महिन्यासाठी पुन्हा लांबणीवर टाकली आहे. यासाठी कंपनीला संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे. डिश टीव्हीला येस बँकने व्यवस्थापकीय संचालक गोएल आणि चार संचालकांना काढण्यासंबंधीची नोटीस दिली होती. यस बँकेचे डिश टीव्हीत 24 टक्के इतका वाटा आहे.
डिश टीव्हिने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 साठी बैठकीला एक महिन्यांची वाढ देत अन्य गोष्टींसाठीही मंजुरी मिळाली आहे. कंपनीची वार्षिक बैठक 30 नोव्हेंबर 2021 रोजी होणार होती.